|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » वारकऱयांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज

वारकऱयांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज 

प्रसाद सु. प्रभू / पंढरपूर

शुक्रवारी आषाढी एकादशी आणि गुरुवारी पालखी सोहळय़ासह लाखो वारकरी पंढरीत दाखल होतील. या पार्श्वभूमीवर पंढरपूर सज्ज झाले आहे. लाखो भाविक येथे दाखल होऊ लागल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पंढरपूरमध्ये लाडक्मया विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर किंवा घेण्यापूर्वीच याच विठ्ठलाचा पूर्व अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱया भगवान कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दोन ठिकाणांवर वारकरी मेळे दाखल होत आहेत.

यंदा प्रथमच चंद्रभागेतिरी महिलांसाठी खास कपडे बदलण्याचे कक्ष खोलण्यात आले आहेत. दर्शनासाठी भव्य पत्रा शेड आहे. राज्यभरातून बंदोबस्तासाठी पोलीस दाखल झाले आहेत. तुळशीमाळ, टाळ, आकर्षक विठ्ठल मूर्ती, प्रसाद आदी साहित्याने पंढरपूरचा बाजार फुलला आहे.

पंढरपूरबरोबरच गोपाळपूर आणि विष्णूपद या दोन ठिकाणी ही गर्दी होत आहे. अर्धा कृष्ण आणि अर्धा विठ्ठल हे रूप, नामदेवांचा काळ, जनाईचा संसार आणि तिचे जाते व घुसळण आदी ठिकाणे गर्दीने फुलताहेत. गोपाळकाला करून कृष्णाने जेथे बासरी ठेवली आणि जेथे आजही कृष्णकालिन पाऊलखुणा आहेत अशा विष्णुपदावर तर अनेक वारकरी दाखल होतात. चंद्रभागेच्या पात्रात नौकाविहार करून नारद पाण्यात बुडालेल्या मंदिराचेही दर्शन घेतात.

गोपाळपूर येथे कृष्णाने गोपाळकाला केला होता. संत नामदेवांनी बहिणीप्रमाणे सांभाळलेली त्यांची दासी जनाबाई यांच्या भेटीस विठ्ठल स्वतः आले होते. या कथांना आधार देणारे पुरावे येथे सापडतात. यामुळे वारकऱयांच्या दृष्टीने हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराप्रमाणेच महत्वाचे ठरते. विष्णूतीर्थावर दरवषी मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य असते. यामुळे याठिकाणी जाऊन कृष्णाने विठ्ठल अवतार घेण्यापूर्वी घालवलेला काळ आणि त्याच्या खुणा पाहण्यात वारकरी रंगून जात आहेत. आता आषाढी एकादशीपर्यंत आणि त्यानंतरही आठवडाभर वारकऱयांची गर्दी कायम राहणार आहे. 

सहा दिवसात बनविले सहा लाख लाडू  

पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांना पंढरपूर देवस्थान समिती लाडूचा प्रसाद देते. हे लाडू बनविण्याचे कंत्राट मंगळवेढा येथील सुवर्णक्रांती महिला उद्योग सेवा संस्थेला मिळाले आहे. याअंतर्गत अनेक महिलांना रोजगार मिळाला. या महिलांनी अवघ्या सहा दिवसात सहा लाख लाडू बनविले आहेत. आणखी सहा लाख लाडू त्यांना बनवायचे आहेत. मंदिर समितीने 12 लाख लाडूंची मागणी केली असल्याने या महिला सध्या अहोरात्र झटत आहेत. या लाडूंच्या निर्मितीची प्रक्रिया करताना स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जात असून प्रसाद हा शुद्ध असावा या दृष्टीने या महिला संघटनेने दक्षता घेतली आहे. 

मागील वषी मंदिर समितीने याच संघाला लाडू बनविण्याचे काम दिले होते. त्यावेळी 9 लाख लाडूंची मागणी होती. ते काम वेळेत पूर्ण केल्याने यंदा 12 लाख लाडू पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती या संघाच्या अध्यक्षा कविता गवळी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

उर्वरित दोन दिवसात आणखी 6 लाख लाडू बनविले जाणार आहेत. यासाठी शिफ्टमध्ये काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडू बांधण्याचे काम महिला करीत असल्या तरी मुख्य आचारी व इतर वजनी कामे करण्यासाठी पुरुष सहकाऱयांची ही मदत लागते असे त्या म्हणाल्या.

पंढरपूरला आलेले वारकरी परत जाताना लाडूचा प्रसाद घरी नेणे जास्त पसंत करतात. पंढरीचे लाडू घेऊन जाणे ही वारीतील एक पद्धतच होऊन गेली आहे. यामुळे हे लाडू भाविक घरी पोहोचेपर्यंत चांगले राहावे हीच अपेक्षा असते. हे काम महिलांकडेच सोपविल्याने लाडूंचा दर्जा टिकवण्यावर भर देता आला आहे.

Related posts: