|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘वंचित’च्या प्रदेश महासचिवपदी डॉ. अरुणा माळी

‘वंचित’च्या प्रदेश महासचिवपदी डॉ. अरुणा माळी 

प्रतिनिधी / कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिवपदी येथील डॉ. अरुणा माळी यांची निवड करण्यात आली आहे. आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये डॉ. माळी यांना प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली.

डॉ. माळी या मूळच्या येल्लूर (जि. सांगली) येथील आहेत. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी बॉटनी (वनस्पतीशास्त्र) मधून पीएचडी मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लढल्या होत्या. त्यांना साठ हजारहून अधिक मते मिळाली होती.

  पक्षादेशानुसार कार्य करणार : डॉ. माळी

या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. अरुणा माळी म्हणाल्या, आमचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजातील विविध जाती, धर्मातील वंचितांच्या विकासासाठी, न्याय्य, हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. लोकसभेत आम्ही ताकद दाखविली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियोजन सुरू आहे. स्थानिक स्तरावर संघटनात्मक बांधणीचे काम करण्यात येईल. पक्षाच्या आदेशानुसार पुढील कार्य केले जाईल.