|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्पर्धा परीक्षेच्या अपयशातून युवकाची आत्महत्त्या

स्पर्धा परीक्षेच्या अपयशातून युवकाची आत्महत्त्या 

वार्ताहर/ हेर्ले

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने येथील दीपक आण्णासो उंचगावे (वय 29) या युवकाने राहत्या घरी पहाटेच्या सुमारास गळफास लावून घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. दीपक चार वर्षांपासून एमपीएसी व विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. गेल्या चार वर्षांत विविध स्पर्धा त्याने दिल्या. मात्र त्याला यामध्ये यश आले नाही. यामुळे तो निराश होता. सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे अभ्यासाच्यानिमित्ताने उठला होता. पहाटे 6 वाजता  आईने चहा घेण्यास खोलीत पाहिले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. यामुळे कुटुंबियांसह मित्रमंडळींना धक्का बसला आहे.