|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » खडकवासला 100 टक्के भरले, मुठा नदीत सोडले पाणी

खडकवासला 100 टक्के भरले, मुठा नदीत सोडले पाणी 

 

पुणे /वार्ताहर  : 

खडकवासला साखळी प्रकल्पात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या संततधर पावसामुळे बुधवारी खडकवासला धरणात जवळजवळ शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून बुधवारी रात्री उशिरा मुठा कालव्यातून 500 क्मयुसेकने पाणी सोडण्यात आले आहे, तर मुठा नदीत रात्री उशिरा 2000 क्मयुसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला, अशी माहिती खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. मध्यरात्री दोन वाजल्यापासून 1700 क्मयुसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

खडकवासलापाठोपाठ पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरून वाहू लागले असून त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पिंपळगाव जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.