|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत दोघे बुडाले, दहा तासांपासून शोध सुरूच

मुंबईत दोघे बुडाले, दहा तासांपासून शोध सुरूच 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या मुलाचा नऊ तास उलटले तरी अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि पालिका कर्मचारी बुधवारी रात्रीपासून या मुलाचा शोध घेत आहेत. हा मुलगा नाल्यात पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालं आहे. मात्र नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मुलगा वाहून गेल्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. पवईतील बांगुर्डे तलावातही एक तरुण बुधवारी रात्री बुडाला असून त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.

मालाडच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील एका नाल्यात दिव्यांश धानसी हा दीड वर्षाचा मुलगा पडला. बुधवारी रात्री 10.24 वाजता ही घटना घडली. घरातून खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरून तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱयातील फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या आसपास कोणीच नसल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱयात दिसत आहे.