|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू

वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

मराठा समाजातील वैद्यकीयशिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वषीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वषी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. प्रवेश
प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.

दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये. 2019-20 या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे, यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधरणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.