|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » बेरोजगारीचा प्रश्न गंभीर : पी. चिदंबरम

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर : पी. चिदंबरम 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सत्ताधरी भाजपावर देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून निशाणा साधला. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र केंद्र सरकार याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी आरोप केला. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.

चिदंबरम म्हणाले, की देशातील उच्चशिक्षीत तरुणवर्गाला सध्या बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेवूनही अनेकांच्या हाताला काम नाही. खलाशी पदाच्या 62,907 जागांसाठी 82 लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यातील 4 लाख 19 हजार 137 उमेदवार बी.टेक. पदवी उत्तीर्ण आहेत. तर 40 हजार 751 उमेदवार हे मास्टर ऑफ इंजिनिअर्स आहेत. या आकडेवारीवरून स्पष्टपणे देशातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार बेरोजगारीवर उपाययोजना करण्यात सर्वच पातळय़ांवर अपयशी ठरले आहे.