|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » कर्नाटकः आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय आजच

कर्नाटकः आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय आजच 

 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कर्नाटक विधनसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षांच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या बरोबरच सर्व बंडखोर आमदारांना सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कर्नाटकातील सर्व बंडखोर आमदार आज संध्याकाळी 6 वाजता विधनसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.