|Saturday, October 19, 2019
You are here: Home » विविधा » 30 वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज चुकवण्यासाठी केनियाचे खासदार औरंगाबादेत

30 वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज चुकवण्यासाठी केनियाचे खासदार औरंगाबादेत 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

30 वर्षांपूर्वी घेतलेले 200 रुपयांचे कर्ज चुकवण्यासाठी केनियाचे खासदार रिचर्ड टोंगी यांनी थेट औरंगाबादेत येत आपला प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. टोंगी यांची कृतज्ञता पाहून कोणे एके काळी कर्ज देणारे औरंगाबादचे 70 वषीय काशिनाथ गवळी हे देखील भारावून गेले.

रिचर्ड टोंगी हे केनियातील न्यारीबरी चाचे या मतदारसंघाचे खासदार आहेत. ते सन 1985-89 दरम्यान औरंगाबादमधील एका महाविद्यालयात मॅनेजमेंटचा कोर्स करत होते. केनियाला परतण्यापूर्वी त्यांनी गवळी यांच्याकडून 200 रुपयांचे कर्ज घेतले होते. गवळी त्यावेळी वानखेडे नगरात रेशन दुकान चालवत होते. त्याच भागात टोंगीही राहत असत. पुढे रिचर्ड टोंगी हा तरूण केनियाच्या राजकारणात उतरला. न्यारीबरी चाची मतदारसंघातून खासदार आणि पुढे केनियाच्या संरक्षण-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय समितीचा उपाध्यक्ष झाला. गेल्या आठवडय़ात त्याला अचानक केनियन शिष्टमंडळासोबत भारत दौऱयाची संधी मिळाली. पंतप्रधन मोदींची भेट झाल्यावर रिचर्ड टोंगी औरंगाबादेत दाखल झाले. घरमालक-किराणा दुकानदारांचा शोध काढून त्याने त्यांना 200 रुपयांच्या मोबदल्यात 250 युरो डॉलर्स देत ऋण चुकवले.