|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या पीकविम्यासाठी शिवसेनेचा बुधवारी मोर्चा

शेतकऱयांच्या पीकविम्यासाठी शिवसेनेचा बुधवारी मोर्चा 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

शेतकऱयांना मिळणाऱया पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱयांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांदे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर 17 जुलै रोजी मोर्चा काढेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, सगळय़ा कर्जमाफी झालेल्या शेतकऱयांची नावं बँकांनी लावली पाहिजेच अशी मागणी केली आहे. काही ठिकाणी कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं गेलं मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे.

सरकारच्या योजना शेतकऱयांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. शेतकऱयांना जर कुणी नाडले तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱयांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.