|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शासन आदेशानुसार सुरक्षा रक्षकांच्या पगारात वाढ

शासन आदेशानुसार सुरक्षा रक्षकांच्या पगारात वाढ 

प्रतिनिधी /कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हय़ात 1981 च्या कायद्यानुसार संरक्षीत केलेले गार्ड गेल्या 4 ते 5 वर्षापासून कोल्हापूर सुरक्षा रक्षक मंडळाकडे कार्यरत आहेत. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने वर्षभर करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेवून, शासनाने सुरक्षा रक्षकांच्या पगारात वाढ करण्यात यावी, असे परिपत्रक जाहीर केले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कोल्हापुरात आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आतषबाजी करून पेढे वाटप केले.
नोंदीत सर्व सुरक्षा रक्षकांच्या पगारात वाढ होणार असल्याचे वृत्त ऐकताच सर्व सुरक्षा रक्षकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर एकत्रित आले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी पगार वाढीच्या सूचना दिल्यांनर भारतीय मजदूर संघाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश अध्यक्षा अनुजा धरणगावकर, कार्याध्यक्ष मुकुंदराव जोशी, जिल्हा चिटणीस अभिजित केकरे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा अध्यक्ष एस. एन. पाटील, प्रमोद बागडी, अभिजित पाटील, महेश फाळके, सुरेश पाटील आदी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.