|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनगोळ येथे पावसामुळे घर कोसळले

अनगोळ येथे पावसामुळे घर कोसळले 

अनगोळ लोहार गल्ली येथे सतत पडणाऱया पावसामुळे   मंगळवारी दुपारी दोन वाजता

एक घर कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर निघुन गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनगोळ लोहार गल्ली येथील रहिवासी प्रकाश गुंडूपंत अनगोळकर लोहार यांचे  घर पडुन  सुमारे एक लाखचे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱया पावसामुळे हे घर कोसळले आहे. या घरात प्रकाश अनगोळकर लोहार यांची मुलगी  कल्पना राजेश सुतार ह्या रहात होत्या. त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास त्या कांही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यामुळे सुदैवाने त्या बचावल्या. पण घरामध्ये असलेले संसार उपयोगी भांडी व इतर सामान त्या मध्ये सापडले. तसेच घरामधे ठेवण्यात आलेली सायकल, व एक दुचाकीचे नुकसान झाले आहे. सदर कुटूंबाची परीस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.