|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विनयभंग, बलात्कारप्रकरणी झेडपीतील कर्मचाऱयावर गुन्हा

विनयभंग, बलात्कारप्रकरणी झेडपीतील कर्मचाऱयावर गुन्हा 

प्रतिनिधी /सातारा  :

सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वरीष्ठ सहाय्यक कर्मचारी गोपीचंद तानाजी पवार (रा. अमरलक्ष्मी स्टॉप, एमआयडीसी, सातारा) याच्याविरुध्द घटस्फोटीत महिलेवर बलात्कार व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार महिला 33 वर्षाची आहे. महिलेचा 2005 मध्ये विवाह झालेला होता. 2017 मध्ये मात्र पतीसोबत पटत नसल्याने महिला माहेरी आली होती. त्यावेळी संशयित गोपीचंद पवार याची व महिलेची ओळख झाली. महिलेचे पतीसोबत पटत नसल्याचे गोपीचंद याला समजल्यानंतर त्याने ‘महिलेला पती सोबत राहू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला नोकरीला लावतो. तुझ्या मुलांनाही सांभाळतो,’ असे म्हणून महिलेचा विश्वास संपादन केला.

एप्रिल, मे 2018 मध्ये गोपीचंद पवार याने महिलेला फोन करुन पतीबाबत बोलायचे असल्याचे सांगून त्याच्या घरी बोलावले. महिला घरी गेल्यानंतर त्याने पतीसोबत घटस्फोट घेण्याचा सल्ला देवून तुझ्याशी लग्नग्न करतो, असे खोटे सांगून महिलेवर जबरदस्तीने वेळावेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. महिलेने लग्नाबाबत विषय काढल्यानंतर अगोदर पतीशी घटस्फोट घे, तुला नोकरीला लावली की मग तुझ्याशी लग्नग्न करतो, असे सांगून लग्नग्नाची टाळाटाळ करायचा.

तक्रारदार महिलेने पतीसोबत गेल्याच जून 2019 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया झाल्यानंतर महिलेने गोपीचंद पवार याला लग्नग्न करण्यासाठी सांगितल्यानंतर त्याने चारचाकी कारमधून फिरायला नेले. यावेळी संशयिताने महिलेला तिच्याशी लग्नग्न करणार नसल्याचे सांगून दमदाटी केली. या घटनेमुळे महिला घाबरली. नोकरीचे खोटे आश्वासन देवून बलात्कार केल्याने अखेर महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयितावर बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.