|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या केवायसीला आधारची गरज नाही

मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या केवायसीला आधारची गरज नाही 

नवी दिल्ली :

 आधार कायद्यात संशोधन करण्यात आल्यानंतर मोबाईल वॉलेट कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सदरच्या ग्राहकांना मोबाईल वॉलेटचा वापर करण्यासाठी आधार कार्डची सक्ती आवश्यक नसणार आहे. सध्या मोबाईल वॉलेटचा वापर केल्यावर ग्राहकांना केवायसी पूर्ण करावी लागत होती. आणि यामध्ये आधार असणे सक्तीचे होते.  आणि त्यासाठी मॅन्युअली पडताळणी करण्यासाठीची प्रक्रिया सोपी नव्हती. कारण यामध्ये कंपन्यांना एक केवायसी पूर्ण करण्यासाठी 200 ते 250 खर्च येत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु आधारची सक्ती बंद होणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.