|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय आयफोन आता युरोपच्या बाजारात

भारतीय आयफोन आता युरोपच्या बाजारात 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

सरकारकडून चालवण्यात येणाऱया ‘मेक इन इंडिया’च्या प्रकल्पाला समाधानकारक चालन मिळत असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिग्गज आयटी कंपनी ऍपलने भारतात निर्मिती केलेल्या आयफोनला युरोपच्या बाजारापेठेत निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

 कंपनीने 2016मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन चालू केले होते. ज्याला मागील काही महिन्यांमध्ये बऱयापैकी चालना मिळाली आहे. तरी आगामी काळात निर्यातीत वाढ करुन लवकरच भारताची ओळख निर्यात केंद्र म्हणून केली जाणार असून तशी योजना उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बेंगळूर येथील कंपनीच्या उपलब्ध योजनांच्या साहाय्याने युरोपीय बाजारात आयफोनची निर्यात करण्यात येत आहे. एका महिन्यात जवळपास 1 लाख युनिट्स आयफोनची निर्यात करण्यात आल्याची माहिती काउटरपाँईटचे संशोधक संचालक नील शाह यांनी दिली आहे.

व्यापार युद्धाचा फायदा

अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धाचा फायदा भारताला  झाला आहे तर दुसऱया बाजूला चीनमधील ऍपलचे उत्पादन कमी करण्यासाठी प्रयत्न ऍपलने प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.