|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन नोंदणी-ड्रायव्हिंगचा डेटा 65 कोटींना विकला कमाई

वाहन नोंदणी-ड्रायव्हिंगचा डेटा 65 कोटींना विकला कमाई 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

केंद सरकारने डेटा शेअरिग पॉलिसीवर काम सुरु केलेले आहे. त्यामुळे आपल्याला
एखाद्या कंपनीमधून कॉल आल्यावर आपणास भिण्याची गरज नाही आहे. कारण सरकार स्वतःहून आपल्याकडे संकलीत असणारी ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणीची माहिती अन्य सरकारी व काही खासगी कंपन्याना विकली आहे. त्यामधून कोटय़वधीची कमाई केली आहे.

केंद्र सरकरने वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती विकून 65 कोटींची कमाई केलेली आहे. त्यांचा प्रारंभ चालू वर्षाच्या सुरुवातीला केला आहे. या प्रकल्पाला कॅबिनेटकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. तर सरकारकडून आतापर्यंत 87 खासगी कंपन्या आणि 32 सरकारी कंपन्यांना सदरची माहिती सरकारने विकलेली आहे.

सदरच्या योजनेमधून वाहनांची माहिती खरेदी करणाऱया कंपन्यांना विहान आणि सारथी डेटाबेस ऍक्सेस करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा उपयोग आतापर्यंत आरटीओकडून करण्यात येत होता. विहान आणि सारथी यांना पहिल्यादा 2011 मध्ये सादर करण्यात आले होते. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात यावर माहितीचे संकलन केले होते.

विहान-सारथी

विहान सॉफ्टवेअरमध्ये वाहनाची नोंदणी, कर, फिटनेस, चलन आणि परमिट आदी माहिती साठवण्यात आली आहे. तर दुसऱया बाजूला ड्रायव्हिंग लायसन्स, फि चा तपशिल आदी माहितीचे संकलन करण्यात आलेले आहे. दोन्ही प्लेटफार्मवर जवळपास संकलीत करण्यात आलेल्या माहितीच्या विक्रीमध्ये 25 कोटी नोंदणीकृत वाहने आणि 15 कोटी ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे.

नितीन गडकरीचे स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डेटा शेअरिग पॉलिसीच्या आधारे खासगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थाना डेटा उपलब्ध करुन देण्याची परवानगी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.