|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » धातू ,ऑटो-फायनान्सच्या तेजीने घसरणीला ब्रेक

धातू ,ऑटो-फायनान्सच्या तेजीने घसरणीला ब्रेक 

वृत्तसंस्था /मुंबई :

चालू सप्ताहात मुंबई शेअर बाजारातील तेजीचा प्रवास काहीसा अडथळय़ाचा होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सोमवारी बाजार कोसळला अन् मंगळवारी हलकी तेजी नोंदवल्यानंतर पुन्हा बुधवारी घसरण झाली. परंतु गुरुवारी मात्र बीएसई सेन्सेक्सने 266 अंकानी तेजी नोंदवली आहे. यात धातू, ऑटो आणि फायनान्स क्षेत्रांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष पॉवेल यांनी चालू महिन्यात व्याजदरात कपात करण्याची घोषणा केलेली आहे. यांचा काहीसा फायदा सेन्सेक्सला झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 335 अंकावर मजल मारत  266.07 वर  स्थिरावरत. 38,823.11 वर बंद झाला. तर इंड्रा डे मध्ये सेन्सेक्स 38,892.50 ने वधारला तर 38,631.31 पर्यत खाली आल्याची नोंद करण्यात आलेली आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 84 अंकानी वधारत 11,582.90 वर बंद झाल्याची नोंद झाली.

दिग्गज कंपन्यांमध्ये हीरोमोटो कॉर्पने सर्वाधिक म्हणजे 4.46 टक्क्यांनी तेजी नोंदवली आहे. इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, वेदान्ता, स्टेट बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, सन फार्मा, टाटा स्टील आणि एचडीएफसीमध्ये 3.63 टक्क्यांनी समभाग वधारल्याची नोंद केली. अन्य कंपन्यांमध्ये टाटा महिंद्रा, येस बँक, टीसीएस, लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍक्सिस बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग 1.27 टक्क्यांनी घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.

अर्थसंकल्पानंतरचा उत्साह 

5 जुलै नंतर प्रथमच भारतीय बाजारातील सुरुवात तेजीची नोंद गुरुवारी करण्यात आली आहे. व आंतरराष्ट्रीय बाजाराची तेजीची किनारही मिळाली. त्यामुळे आज 266 अंकाची तेजी बीएसई सेन्सेक्समध्ये नेंदवण्यात आली आहे. आता या पुढील कालावधीत बाजाराचा प्रवास कोणत्या दिशेने राहणार आहे ते पाहाणे  आवश्यक असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.