|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुचाकींना डंपरच्या धडकेत दोन ठार

दुचाकींना डंपरच्या धडकेत दोन ठार 

प्रतिनिधी /जत :

जत तालुक्यातील सांगली रस्त्यावर गुरूवारी दुपारी सिमेंट डंपरने दोन मोटार सायकलींना दिलेल्या भीषण धडकेत दोन जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मोहन महादेव भंडारे (वय 30), तुषार प्रताप भंडारे (वय 21) अशी मृत युवकांची नावे आहेत. मृत व जखमी हे तासगाव तालुक्यातील येळावी गावचे रहिवासी आहेत. जत येथे भावकीतीलच एका लग्न कार्यासाठी येत असताना हा अपघात घडला आहे. 

   अधिक माहिती अशी, तासगाव तालुक्यातील येळावी येथील भंडारे कुटुंबीयातील मुलीचे लग्न जत तालुक्यातील कोळगिरी येथे होते. या लग्न कार्यासाठी येळावी येथील चौघे युवक दोन वेगवेगळय़ा मोटारसायकलीवरून जतकडे येत होते. या चौघांच्या दोन्ही मोटारसायकली जतपासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱया सांगली रस्त्यावरील पाटील वस्तीनजीकच्या वळणावर आल्या असत्या. याचवेळी जतकडून डफळापूरकडे सिमेंट घेऊन जाणारा गोलाकार डंपरने (डंपर क्रमांक एन. एल. 01 ए.सी. 6308) या वळणावर सुरूवातीस पहिली मोटर सायकल क्रमांक एम. एच. 10 सी. झेड 7125 ला भीषण धडक दिली. याचवेळी मागे असणाऱया दुसरी मोटारसायकल क्रमांक एम. एच. 10 सी. झेड. 8835 ला देखील या डंपरची जोराची धडक बसली.