|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅलेप-सेरेना अंतिम फेरीत

हॅलेप-सेरेना अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था /लंडन :

सिमोना हॅलेपने विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळविताना युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती रुमानियाची पहिली महिला खेळाडू आहे. सातवेळा ही स्पर्धा जिंकलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सशी तिची जेतेपदासाठी लढत होईल. 

सातव्या मानांकित हॅलेपने स्विटोलिनाचा 6-1, 6-3 असा सहज पराभव केला. यापूर्वी 2018 मध्ये तिने प्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची तिची ही पाचवी वेळ आहे. दुसऱया उपांत्य लढतीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने झेकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाचा 6-1, 6-2 असा एकतर्फी धुव्वा उडत अंतिम फेरी गाठली. हॅलेप व सेरेना यांच्यात आतापर्यंत दहावेळा गाठ पडली असून सेरेनाने 9 तर हॅलेपने फक्त एकदा विजय मिळविला आहे. सेरेनाने आतापय 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून 24 वे जेतेपद मिळवून मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 अजिंक्यपदे मिळविण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

फेडरर-नदाल आज ‘एपिक’ लढत

टेनिसमधील दिग्गज चार खेळाडूंपैकी फेडरर व नदाल यांच्यात शुकवारी विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यासाठी उपांत्य लढत होत आहे. 11 वर्षांपूर्वी याच सेंटर कोर्टवर दोघांची ऐतिहासिक लढत झाली होती. आजही टेनिसमधील ती एक सर्वोत्तम लढत मानली जाते. चार तास 48 मिनिटे व पाच सेट्स रंगलेल्या त्या लढतीत नदालने विजय मिळवित जेतेपद पटकावले होते. त्या लढतीत पावसाचा व्यत्यय येत राहिल्याने तीन तब्बल सात तास लांबली होती. अकरा वर्षांच्या खंडानंतर टेनिसमधील या दोन सर्वात यशस्वी टेनिसपटूंत पुन्हा एकदा गाठ पडणार असल्याने सर्व शौकिनांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. दोघांनी मिळून एकूण 38 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली असून 100 दशलक्ष डॉलर्सहून अधिक बक्षीस रक्कमही पटकावली आहे.