|Sunday, October 20, 2019
You are here: Home » क्रिडा » लक्ष्य सेन, प्रणॉय, वर्मा दुसऱया फेरीत

लक्ष्य सेन, प्रणॉय, वर्मा दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था /फुलेरटॉन :

येथे सुरू झालेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एच.एस. प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांनी पुरूष एकेरीची दुसरी फेरी गाठली. लक्ष्य सेनने पहिल्या फेरीत आपल्याच देशाच्या पी काश्यपला पराभवाचा धक्का दिला.

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात लक्ष्य सेनने पी कश्यपचा केवळ  31 मिनिटात 21-11, 21-18 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. सेनचा दुसऱया फेरीतील सामना सौरभ वर्माशी होणार आहे. सौरभ वर्माने पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या पिनेटीचा 65 मिनिटांच्या कालावधीत 21-23, 21-15, 22-20 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात एच.एस प्रणॉयने जपानच्या इगारेशीवर 21-23, 24-22, 21-18 अशी मात केली. तैपेईच्या वेईने 65 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या जयरामचे आव्हान 21-16, 18-21, 21-16 असे संपुष्टात आणले. महिला एकेरीत भारताच्या श्रीकृष्णा प्रिया आणि अरूणा यांचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले. मिश्र दुहेरीत भारताच्या के. तरूण आणि कॅनडाचा संकेत यांचे आव्हान पहिल्या फेरीत संपले.