|Sunday, October 20, 2019
You are here: Home » क्रिडा » अफगाणच्या आलमवर वर्षाची बंदी

अफगाणच्या आलमवर वर्षाची बंदी 

वृत्तसंस्था / काबुल :

अफगाण क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आफताब आलम याच्यावर अफगाण क्रिकेट संघटनेने एक वर्षांची बंदी घातली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आलमने बेशिस्त वर्तन करत शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे आफताब आलमला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रेकेटमध्ये एक वर्ष सहभागी होता येणार नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 22 जून रोजी भारताबरोबर झालेल्या शेवटच्या सामन्यात आलमचा अफगाण संघात समावेश होता. अफगाण संघाची ज्या हॉटेलमध्ये निवासाची सोय करण्यात आली होती. तेथे आलमने एका पाहुण्या आलेल्या महिलेबरोबर बेशिस्त वर्तन केले होते. यानंतर आलमला तातडीने मायदेशी पाठविण्यात आले. अफगाणच्या क्रिकेट मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गेल्या आठवडय़ात येथे झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत आलमवर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.