|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय संघाच्या फिजीओचा करार समाप्त

भारतीय संघाच्या फिजीओचा करार समाप्त 

वृत्तसंस्था /मुंबई :

भारतीय क्रिकेट संघाचा फिजीओ पॅट्रीक फरहार्ट यांचा मंडळाबरोबरचा करार समाप्त झाला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाला गेली चार वर्षे फरहार्ट हे फिजीओ म्हणून लाभले होते. त्यांच्या करारची मुदत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपुष्टात येणार होती. भारतीय संघातील खेळाडू तसेच भारतीय क्रिकेट मंडळाने आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दल फरहार्ट यांनी आभार मानले आहेत.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. आपल्या फिजीओ कालावधीतील हा शेवटचा सामना असल्याचे फरहार्ट यांनी म्हटले आहे. 2015 साली भारतीय क्रिकेट मंडळाने फरहार्ट यांची भारतीय संघाच्या फिजीओ म्हणून नियुक्ती केली होती