|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाचा 16 वर्षीय बॅरीशी करार

बार्सिलोनाचा 16 वर्षीय बॅरीशी करार 

वृत्तसंस्था /ला मेसिया :

इंग्लंडचा 16 वर्षीय फुटबॉलपटू लुई बॅरीबरोबर बार्सिलोना संघाने करार केला आहे. बॅरीला करारबद्ध करण्यासाठी बार्सिलोना आणि पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण बुधवारी बार्सिलोनाने शेवटच्या क्षणी बॅरी बरोबर करार करत पीएसजीची संधी हुकविली.

इंग्लीश प्रिमियर लीग स्पर्धेत 16 वर्षीय बॅरी हा वेस्ट ब्रोमीच अल्बियॉन संघाकडून खेळत होता. बॅरी बरोबर पीएसजीने करार करण्याचे जवळपास निश्चित केले होते. त्यासाठी त्याला वैद्यकीय चांचणीसाठी बोलविण्यात आले होते पण शेवटच्याक्षणी बार्सिलोना संघाने बॅरी बरोबर करार करण्यात यश मिळविले.