|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणींसंदर्भात आज दिल्लीत बैठक

खाणींसंदर्भात आज दिल्लीत बैठक 

प्रतिनिधी /पणजी :

गोव्यातील खाणींसंदर्भात उच्च पातळीवरील बैठक आज शुक्रवार दि. 12 रोजी सायं. 4 वा. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच केंद्रीय खनिजमंत्री प्रल्हाद जोशी हे यावेळी उपस्थित राहतील.

आज होणाऱया बैठकीत गोव्यातील खाणी पुन्हा कशा सुरु करता येतील, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण आहे त्या अनुषंगाने भारत सरकारने कोणती भूमिका घ्यावी? येत्या ऑक्टोबरपासून राज्यातील खाणी सुरु करण्याचा मानस मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता. त्या दृष्टिकोनातून आतापासून कामाला लागणे आवश्यक आहे ही बाब मुख्यमंत्र्यांनी अमित शहा तसेच प्रल्हाद जोशी यांच्या कानावर अगोदरच घातलेली आहे. आजच्या बैठकीत या सर्व मुद्यांवर चर्चा होईल व त्यात नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याबाबत कमालीची उत्सुकता लागलेली आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने गेल्या चार वर्षात राज्य सरकारला सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे.