|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजप स्वतःची दिशा बदलतोय : उत्पल पर्रीकर

भाजप स्वतःची दिशा बदलतोय : उत्पल पर्रीकर 

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव व पणजीमध्ये ज्यांना भाजपने उमेदवारी देण्याबाबत विचार चालविला होता त्या उत्पल पर्रीकर यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांनी पक्षासाठी आजवर दिलेले योगदान याचीही काळजी घेणे आवश्यक होते. मनोहर पर्रीकर यांनी पक्षाला दिलेल्या दिशेत आता बदल होतोय. बाबूश मोन्सेरात यांना पक्षात घेतलेले आहे खरे! परंतु, पुढील निवडणुकीपर्यंत तो नेमका कोणत्या पक्षात असेल कोणी सांगावे? असा खोचक सवालही उत्पल पर्रीकर यांनी प्रसार माध्यमांशी व्यक्त केला आहे.