|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वॉर्ड पुनर्रचना -आरक्षण सुनावणीची शक्मयता कमी

वॉर्ड पुनर्रचना -आरक्षण सुनावणीची शक्मयता कमी 

प्रतिनिधी / बेळगाव :

महापालिका वॉर्ड पुनर्रचना,आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी शुक्रवार दि. 12 रोजी होणार आहे. मात्र सध्या कर्नाटक सरकार डळमळीत असल्याने ऍडव्होकेट ऑफ जनरल न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्मयता कमी आहे. यामुळे आजची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्मयता आहे आहे.

       राज्यातील 63 आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  झाल्या. मात्र काही महानगरपालिका, नगरपालिकांच्या वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबत धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिका वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाविरोधात माजी उपमहापौर धनराज गवळी आणि माजी नगरसेवक भैरगौडा पाटील यांच्यासह 10 जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामुळे बेळगावसह विविध महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व न्यायालयाला उन्हाळी सुटी या कारणांमुळे याचिकेची सुनावणी झाली नव्हती. 

मंगळूरसह 13 नगरपालिकांचे आरक्षण उच्च न्यायालयाने जैसे थे ठेवले आहे. यामुळे बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबत न्यायालय कोणता निकाल देणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.