|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकमान्यच्या सोनार गल्ली वडगाव शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतर

लोकमान्यच्या सोनार गल्ली वडगाव शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतर 

बेळगाव / प्रतिनिधी :

लोकमान्य सोसायटीच्या सोनार गल्ली वडगाव येथील शाखेचे स्वत:च्या वास्तूमध्ये स्थलांतर झाले आहे. यानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शाखा आता दत्त गल्ली वडगाव येथील श्रीमाता रेसिडेन्सी येथे कार्यान्वित झाली आहे. कार्यक्रमाला सोसायटीचे ज्ये÷ संचालक प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, पंढरी परब, गजानन धामणेकर, सीईओ अभिजित दीक्षित, जनरल मॅनेजर (ऍडव्हान्स विभाग) अजित शिंदे, रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, वरि÷ व्यवस्थापक सी. आर. पाटील, समन्वयक विनायक जाधव, शाखा व्यवस्थापक एन. वाय. गिरमल आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी लक्ष्मीपूजन व ग्राहकांशी संवाद असा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मान्यवर सहभागी झाले होते.