|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक लोकसंख्या दिन

जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक लोकसंख्या दिन 

बेळगाव प्रतिनिधी :

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आरोग्य कुटुंब कल्याण खाते, नेहरू युथ केंद्र, बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था, महिला बालकल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी बिम्स येथील सभागृहात जागतिक लोकसंख्या दिन पार पडला.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांच्या हस्ते झेंडा दाखवून जागृती फेरीला सुरूवात केली. चन्नम्मा मार्गे बिम्स आवारात फेरीची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळळी व आरोग्य खात्याचे अधिकारी व भरतेश वैद्यकीय कॉलेजचे विद्यार्थी, आशा कार्यकत्या उपस्थित होत्या. फेरी दरम्यान लोकसंख्या वाढीविषयी जागृती केली.

यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रा. एम. एन. त्यागराज म्हणाले, जगात महासत्ता म्हणून आपला देश पुढे येत असताना लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंब नियोजन यासाठी फार महत्त्वाचे आहे. यावेळी जिल्हा पंचायत सीईओ राजेंद्र के. व्ही. यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी एस. टी कळसद, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरूण कंटाबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी आप्पासाहेब नरट्टी, आरोग्य खात्याचे अधिकारी, विविध खात्याचे अधिकारी व आशा कार्यकत्या मोठय़ा संख्येने उपस्थित होते.