|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सावर्डे येथे विजेचा धक्का बसून लाईनमन मृत्युमुखी

सावर्डे येथे विजेचा धक्का बसून लाईनमन मृत्युमुखी 

प्रतिनिधी /कुडचडे :

पंटेमळ, कुडचडे येथील वीज खात्याच्या उपविभाग-14 मध्ये काम करणारा लाईनमन दिलीप अप्पा गावकर (वय 43 वर्षे) याला बुधवारी रात्री उशिरा काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू आल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली.

मयत गावकर हा वलडंव, काले येथील असून सदर घटना बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास गुड्डेमळ, सावर्डे येथे घडली. त्यानंतर लगेच 108 सेवेच्या रुग्णवाहिकेने सदर व्यक्तीला काकोडा येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे डॉक्टरनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला. शवचिकित्सा अहवालात गावकर याला विजेचा धक्का बसून मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेचा पंचनामा कुडचडेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ माहाजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी केला.