|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धोणशी येथे घरावर वृक्ष कोसळून हानी

धोणशी येथे घरावर वृक्ष कोसळून हानी 

वार्ताहर /मडकई :

धोणशी नागेशी येथील चंद्रकांत गावडे यांच्या घरांवर बुधवारी रात्री वृक्ष कोसळून घराची हानी झाली. छप्पराची कौले फुटली व पत्रेही उडाले. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेची माहिती स्थानिक पंचसदस्य सलोनी गावडे यांनी अग्नीशामक दलाशी संपर्क साधला. गुरुवारी सकाळी उशिरापर्यंत अग्नीशामक दल घटनास्थळी पोचू  न शकल्याने आमदार सुदिन ढवळीकर यांनी खासगी कामगार आणून वृक्ष हटविण्यास  मदत केली. त्यानंतर अग्नीशामक दल घटनास्थळी पोचले. नुकसानी झालेल्या घरमालकाला सुदिन ढवळीकर यांनी आर्थिक मदत केली आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच, कंत्राटदार दिगंबर नाईक आदी उपस्थित होते.