|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वंदे मातरम गीत संपूर्ण भारत देशासाठी प्रेरणादायी ठरले-डॉ. गोविंद काळे

वंदे मातरम गीत संपूर्ण भारत देशासाठी प्रेरणादायी ठरले-डॉ. गोविंद काळे 

वार्ताहर /हरमल :

बंगालमधील श्रेष्ठ कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले महान काव्य वंदे मारतम् फक्त बंगालपुरते सिमित नसून वंदे मातरम् राष्ट्रीय गीत बनेल असा विश्वास होता. त्या गीतामुळे प्रत्येकांत राष्ट्रभक्ती देशप्रेम ओतप्रोत भरलेले दिसते. स्वातंत्र्यासाठी गीत जसे परिणाकारक ठरले तसेच प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. गोविंद काळे यांनी केले.

हरमलच्या हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या ज्ञानदा सभागृहात, लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी सोसायटी व मातृसेवा प्रतिष्ठानतर्फे वंदे मातरम् व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. वंदे मातरम् पूर्वी गीत होते. परंतु भूमाता ही भारतमाता होती. जननी जन्मभूमिच असे म्हणणारे सर्वश्रेष्ठ आहे. वेदापेक्षा श्रेष्ठ असे वंदे मातरम गीत आपल्यातील सर्व वर्तर्मनाचा ठाव घेत असते. जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपण वंदे मातरम म्हटले पाहिजे. कॉलेजच्या भिंती बोलणाऱया नाहीत, परंतु तुम्ही मुलं जेव्हा चिवचिवाट कराल तेव्हा त्या भिंती बोलतील. जयघोष करा, भारतभूची सेवा करण्यासाठी आपण आयुष्य खर्ची घातली पाहिजे. आपणास पूर्नजन्म मागण्याची संधी मिळाल्यास या पंचक्रोशीत आपण जन्म मागेल. या भूमीत चैतन्य प्रेरणा शक्ती आहे . ही देवभूमी आहे. पालये गावातील अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, म्हणणारे संत सोहिरोबानाथ आंबिये, युद्धात कधीही हार मानली नाही. पानीपत मध्ये विजयी ठरलेले बक्षीबहाद्दर जीवबादादा केरकर तर मुंबई शहर तीन लोकांनी उभे केले त्यातील एक भाऊ दाजी लाड हे या भूमीतीलच. म्हणूनच या पंचक्रोशीत पुर्नजन्म हवा.  भारतमातेचे पांग फेडण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध असायला हवे. असे प्रतिपादन डॉ. काळे यांनी केले.