|Friday, September 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतला तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो’

मुंबईतला तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील काही दिवसांपासून मुंबईतील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव पूर्णपणे भरला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांपैकी तुळशी तलाव हा एक तलाव आहे. तुळशी तलावाची पाणीसाठय़ाची क्षमता 139.17 मीटर इतकी आहे. आज सकाळी या तलावाने 137.10 मीटर एवढी पाणी पातळी गाठली आहे. सध्या तलावात 6 लाख 35 हजार 659 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला वर्षाला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. तर दररोज 4500 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला लागते. त्यापैकी सातही तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.