|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील डबेवाले आज, उद्या सुट्टीवर

मुंबईतील डबेवाले आज, उद्या सुट्टीवर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील नोकरदारांना घरगुती जेवणाचे डबे पुरवणारे मुंबईतील डबेवाले आज आणि उद्या सुट्टीवर जाणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त डबेवाले विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले आहेत. त्यामुळे 12 आणि 13 जुलैला ते आपल्या ग्राहकांना जेवणाचा पुरवठा करु शकणार नाहीत. मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली.

आषाढी एकादशीनिमित्त देशभरातील लाखो भाविक आज पंढपुरात दाखल झाले आहेत. आज मध्यरात्री परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पुजा केली. यंदा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना महापुजेचा मान मिळाला. पंढरपुरात आज सर्वत्त भक्तीमय वातावरण असून, अवघा महाराष्ट्रही विठुरायाच्या भक्तीत लीन झाला आहे. प्रत्येक भाविक हा आपल्या आशा, आकांशा विठूरायासमोर मांडण्यासाठी आज पंढरपुरात येत असतो. त्याचप्रमाणे मुंबईचे डबेवालेही पंढरपूरात दाखल झाले आहेत.