|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » ‘त्या’ आमदाराची भाजपातून हकालपट्टी

‘त्या’ आमदाराची भाजपातून हकालपट्टी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजपाचे वादग्रस्त आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज सकाळी सिंह यांच्यावर ही कारवाई केली.

प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत चार-चार बंदुका हातात घेऊन डान्स करत असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर या भाजप आमदारावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत होती.

सिंह हे उत्तराखंडच्या खानपूर मतदारसंघातून निवडून आले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पत्रकारलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांना तीन महिने निलंबित करण्यात आले होते.