|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं डोकेदुखी : रवी शास्त्री

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं डोकेदुखी : रवी शास्त्री 

 

ऑनलाइन टीम / लंडन : 

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्मयाच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवल्याचं, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केलं आहे.

रवी शास्त्री म्हणाले, होय, मधल्या फळीत आम्हाला एका अनुभवी फलंदाजाची उणीव भासली. मात्र आता या गोष्टीचा विचार भविष्यासाठी करायचा आहे. चौथ्या क्रमांकाची जागा भारतीय संघासाठी नेहमी डोकेदुखी ठरली आहे. लोकेश राहुल, विजय शंकर सारखे खेळाडू यंदाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी होते. मात्र दुखापतीमुळे सगळं चित्र पालटलं, आणि नंतर जे काही घडलं त्यावर नियंत्रण ठेवणं आमच्या हातात नाही राहिलं.

 

Related posts: