|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » आयपीएल प्रमाणे वर्ल्डकपमध्येही प्ले-ऑफ सामने असावेत : कोहली

आयपीएल प्रमाणे वर्ल्डकपमध्येही प्ले-ऑफ सामने असावेत : कोहली 

 

ऑनलाइन टीम /लंडन  : 

जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावात तंबूत परतला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांची 116 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली. या सामन्यानंतर भारताचा कर्णधर विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला एक पर्याय सुचवला आहे. भविष्यात आयपीएल स्पर्धेची बाद फेरी ही इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले-ऑफ फॉरमॅटमध्ये खेळवण्यात यावा, असा पर्याय कोहलीनं सुचवला आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफनुसार गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला अतिरिक्त संधी मिळते आणि भविष्यातील वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये याचा विचार व्हावा, असा कोहलीचा मुद्दा आहे.