|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » संघाची गरज होती तेव्हाच अपयशी : रोहित शर्मा

संघाची गरज होती तेव्हाच अपयशी : रोहित शर्मा 

ऑनलाइन टीम / लंडन  : 

उपांत्य फेरीच्या लढतीतील त्या 30 मिनिटांनी भारतीय संघाचे भविष्यच बदलून टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही खेळाडू अवघ्या 5 धावांत तंबूत परतले. महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी संघर्ष केला, परंतु भारताला 18 धावांनी हार मानावी लागली. या सामन्यात ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती तो रोहित शर्मा अवघ्या एका धवेवर माघारी परतला. रोहितनंही त्या सामन्यात आलेल्या अपयशाची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली.

रोहित म्हणाला, संघाला जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हाच आम्हाला अपयश आलं. 30 मिनिटांच्या त्या अपयशानं आमच्या हातून जेतेपदाचा चषक उंचावण्याची संधी हिसकावून घेतली. माझं मन जाणतंय की किती वेदना होत आहेत ते, तुम्हालाही तशा होत असतील. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही दिलेला पाठिंबा अविश्वसनीय होता. सर्वांचे आभार.