|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » बीसीसीआय प्रशासक विचारणार विराट आणि शास्त्रीला जाब

बीसीसीआय प्रशासक विचारणार विराट आणि शास्त्रीला जाब 

 

ऑनलाइन टीम /लंडन : 

बीसीसीआयवर सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले प्रशासक टीम इंडियाच्या पराभवाची समीक्षा करणार आहे. उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाबद्दल कर्णधर विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही काही प्रश्न प्रशासकांकडून विचारण्यात येणार आहेत.

विनोद राय अध्यक्ष असलेल्या प्रशासक समितीमध्ये माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रिव थोडगे यांचा समावेश आहे. प्रशासक समिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशीदेखील चर्चा करणार आहे. विनोद राय यांनी सांगितले की, कर्णधर विराट कोहली आणि मुख्य
प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत बैठक होणार आहे. मात्र ही बैठक कधी व कोठे होईल याबाबत लगेच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Related posts: