|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ातील दहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा

जिल्हय़ातील दहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ातील शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, पुळास, हरकुळ, ओझरम आणि लोरे लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हय़ातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठय़ामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे.  माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पातून 15.16 घ. मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. सावंतवाडी तालुक्मयातील सनमटेंब लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये 95.82 टक्के पाणीसाठा झाला आहे. आंबोली प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 122 मि. मी. इतक्मया पावसाची नोंद झाली आहे.

तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 66.82 टक्के पाणीसाठा झाला असून सध्या या धरणामध्ये 298.9500 द. ल. घ. मी. इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 109 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून 2019 पासून आजपर्यंत एकूण 1721.60 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कणकवली तालुक्मयातील देवधर मध्यम प्रकल्पामध्ये 58.44 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्हय़ातील नद्यांच्या पाणीपातळीमध्येही झपाटय़ाने वाढ होत आहे. तिलारी नदीची पाणीपातळी 39.500 मीटर इतकी असून कर्ली नदीने 5 मीटर पातळी गाठली आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पाणीपातळी 5.700 मीटर इतकी झाली आहे.

Related posts: