|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अटकपूर्व जामिनावर 16 रोजी सुनावणी

अटकपूर्व जामिनावर 16 रोजी सुनावणी 

उपअभियंता चिखलफेकप्रकरण : आणखी अकराजणांवर आहे गुन्हा दाखल

प्रतिनिधी / ओरोस:

महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना रस्त्याच्या दूरवस्थेबाबत जाब विचारत आमदार नितेश राणे व त्यांच्या सहकाऱयांनी त्यांच्यावर चिखलफेक करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी 11 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. या अकराहीजणांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले आहेत. या अर्जावर 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी 4 जुलै रोजी एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. कणकवली पोलिसांनी आणखी 11 जणांवर याच प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते पोलिसांच्या नजरे आड झाले आहेत. दरम्यान, त्यांनी जिल्हा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. यात राकेश परब (चुनवरे), जावेद शेख, अजय गांगण, सुशिल पारकर, उपेंद पाटकर, सिद्धेश वालावलकर, औदूंबर राणे, संजीवनी पवार (सर्व रा. कणकवली), समीर प्रभूगावकर (वागदे), लवू परब (हळवल), शामसुंदर दळवी (कळसुली) यांचा समावेश आहे.

Related posts: