|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » 2019-20 मध्ये नाबार्डचे 55 हजार कोटी जोडण्याचे ध्येय

2019-20 मध्ये नाबार्डचे 55 हजार कोटी जोडण्याचे ध्येय 

विकास कामांना गती देण्यासाठीचा नाबार्डचा प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकटड (नाबार्ड) चालू आर्थिक वर्षात अनेक विकास कामाची वृद्धी व आर्थिक घडी स्थिरावण्यासाठी नाबार्ड येत्या काळात जवळपास 55 हजार कोटी जमविण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे. अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारामधून एकूण 55 हजार कोटी रुपये जोडण्यात येणार आहेत. आर्थिक संस्थाच्या मार्फत पहिल्या तिमाहीत बाजारातून 12 हजार कोटी रुपये जोडले आहेत. तर नाबार्ड लांब पल्याच्या अंतराचा करार करुन ही रक्कम जमा करणार आहे. सदरच्या कराराचा  कालावधी हा सामन्यपणे 10 ते 15 वर्षांच्या काळासाठी निश्चित करण्यात येणार आहे.  

निधीचा वापर

 मागील वित्त वर्षात अपरिवर्तनीय रोख्याच्या माध्यमातून 56,096 कोटी रुपयाची जोडणी करण्यात आल्याचे संकेत नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांनी सांगितले आहे. यामध्ये 33,169 कोटी रुपये सरकारी योजनांसाठी आणि अन्य कार्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला होता. यात स्वच्छ भारत अभियान, प्रधानमत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

कर्ज वितरण

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नाबार्ड अंतर्गत देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून जवळपास 22 टक्क्यांनी कर्जाचे वितरण वाढत जात ते 4.32 लाख कोटीच्या घरात पोहोचले असल्याची नोंद यावेळी करण्यात आली.

Related posts: