|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद 

सेन्सेक्स 87 अंकानी कमजोर, निफ्टी 11,552.50वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी मुंबई शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय बाजाराची कामगिरी ही नकारात्मक वातावरणात झाल्याचे पहावयास मिळाले आहे. मुख्य क्षेत्रामधील फायनान्स क्षेत्रात मोठय़ा घसरणीचा फटका बसला आहे. मात्र गुंतवणूकदार सावध पावले उचलत असल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरतील व्यवहारात सेन्सेक्स 337 अंकावर कार्यरत राहिल्याचे पहावयास मिळाले यात 86.88 अंकानी घसरण होत अंतिम क्षणी 38,736.23 वर सेन्सेक्स स्थिरावला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र 30.40 अंकानी खाली जात 11,552.50 वर बंद झाल्याची नोंद केली आहे. इंड्रा डे मध्ये  निफ्टी 11,639.55 वर वधारला होता.

दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स ओएनजीसी, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, लार्सन ऍण्ट टुब्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग 2.08 टक्क्यांनी घसरलेत. या उलट मात्र वेदान्ता, सन फार्मा, टाटा स्टील, एशियन पेन्टस, हीरोमोटो कॉर्प आणि येस बँक यांचे समभाग 2.44 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.

तिमाही अहवाल सादर होण्याअगोदरच इन्फोसिसच्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण पहावयास मिळाले आहे. यामुळे आगामी काळात कंपनीच्या नफा कमाईत घट होण्याचे संकेत नोंदवले जाताहेत. तर अन्य कंपन्यांही येत्या काळात आपले नफा कमाईचे आकडे सादर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणाऱया सप्ताहातील भांडवली बाजाराचा प्रवास निश्चित होणार असल्याची मते अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केली आहेत.

Related posts: