|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्य सुजलाम-सुफ्ढलाम होऊ दे!

राज्य सुजलाम-सुफ्ढलाम होऊ दे! 

मुख्यमंत्र्यांसह अहमदपूर येथील चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

संकेत कुलकर्णी / पंढरपूर

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।।

गेल्या 20 दिवसांहून अधिक काळ पायी पंढरीस आलेल्या 14 लाखांहून अधिक वारकरी भक्तांच्या उपस्थितीत एकादशीचा अनुपम सोहळा पार पडला. चंद्रभागा तीर, भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये सर्वत्रच विठ्ठलभक्तांची मोठी दाटी पहावयास मिळात होते. त्यामुळे पंढरीतील भाविकांच्या रूपाने साक्षात परब्रम्हच पाहिल्याचा आभास होत होता. संत ज्ञानोबा, संत तुकाराम महाराज यांच्यासोबत आलेल्या लाखों वैष्णवांच्या उपस्थितीत आषाढी एकादशींचा सोहळा शुक्रवारी झाला. यावेळी सुमारे 10 लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी पंढरीत चंद्रभागेतीरी एकवटली होती. त्यामुळे साहजिकच भीमातीर भक्तीच्या अनोख्याच रंगात न्हाऊन निघालेला दिसून आला.

एकादशीची सुरुवात पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करून झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून अहमदपूर येथील विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा बहुमान मिळाला. या दाम्पत्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस आणि अमृता फ्ढडणवीस यांच्या सोबतीने विठ्ठलास राज्यात चांगला पाऊस पडू दे, राज्य सुजलाम सुफ्ढलाम होऊ दे आणि दुष्काळमुक्त होऊ दे, असे साकडे घातले.

पहाटेपासूनच एकादशीमुळे भाविकांनी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. प्रशासनाच्या वतीने येथील बंधाऱयातील पाणी भाविकांच्या सोयीसाठी खुले पेले होते. त्यामुळे पंढरीत दाखल झालेल्या लाखों भाविकांनी या चंद्रभागा स्नानाचा आनंद लुटला. याच दरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व मानांच्या पादुका चंद्रभागा स्नानासाठी आल्या होत्या.

राज्यात चांगला पाऊस पडू दे : मुख्यमंत्र्यांचे साकडे

राज्यात चांगला पाऊस पडू दे, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, राज्याचे कल्याण होऊ दे तसेच राज्य सुजलाम सुफ्ढलाम कर, दुष्काळमुक्तीच्या उपाययोजना करण्यासाठी निसर्गाची साथ आणि सरकारला ताकद मिळू दे, अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे केली.

 

सीमावासियांसह मराठी भाषिकांच्या कायम पाठिशी : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस यांनी विठोबाची शासकीय महापूजा केली. यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींना त्यांच्या मनातले साकडे सांगितले. यावेळी बेळगावच्या मराठी भाषिकांबाबतचा प्रश्न फ्ढडणवीस यांना करण्यात आला. यावर मुख्यमंत्र्यांनी

‘सीमावासियांसह मराठी भाषिकांच्या कायम पाठिशी आहोत’ असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी आम्ही सीमावासियांच्या खंबीरपणे पाठीशी आहोत. सीमावासियांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

Related posts: