|Sunday, February 23, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत -उत्तर कोरिया आज महत्वाचा सामना

भारत -उत्तर कोरिया आज महत्वाचा सामना 

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे यजमान भारत आणि उत्तर कोरिया यांच्यात महत्वाचा सामना खेळविला जाणार आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात सुधारित कामगिरीसह विजयाची नितांत गरज आहे.

या स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारताला 7 जुलै रोजी झालेल्या सलामीच्या सामन्यात ताजीकस्थान संघाकडून 2-4 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी निश्चितच कसरत करावी लागणार आहे. चार संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारताचे आता या स्पर्धेतील उर्वरित दोन सामने असून यापैकी एकही सामना गमवून चालणार नाही. या स्पर्धेची अंतिम फेरी 19 जुलैला होणार आहे. ताजीकस्थान विरूद्धच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने 2-0 अशी आघाडी मिळविली होती.  भारताचे हे दोन्ही गोल कर्णधार क्षेत्रीने नोंदविले. पण त्यानंतर उत्तरार्धात ताजीकस्थानतर्फे 4 गोल नोंदविले गेल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरार्धात भारतीय संघाकडून अनेक चूका घडल्याने त्याना हार पत्करावी लागली.

शनिवारी होणाऱया सामन्यात भारतासारखीच उत्तर कोरियाची स्थिती आहे. उत्तर कोरियाला पहिल्या सामन्यात सिरियाकडून 2-5 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाच्या बचाव फळीला दर्जेदार कामगिरी करावी लागेल. इगोर स्टिमॅकच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघ या स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयासाठी झगडत आहे.

Related posts: