|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » दुती चंद पाचव्या स्थानावर

दुती चंद पाचव्या स्थानावर 

वृत्तसंस्था/ नापोली

इटलीत सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू दुती चंदने महिलांच्या 200 मी धावण्याच्या शर्यतीत पाचवे स्थान मिळविले. या स्पर्धेत दुती चंदने यापूर्वी महिलांच्या 100 मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.

महिलांच्या 100 मी धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी दुती चंद ही भारताची पहिली महिला धावपटू ठरली होती. तिने गेल्या मंगळवारी या क्रीडा प्रकारात दर्जेदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत दुती चंदने 23.30 सेकंदाचा अवधी नोंदविला.

Related posts: