|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » क्रिडा » बोरिस बेकरच्या चषकांचा लिलाव

बोरिस बेकरच्या चषकांचा लिलाव 

वृत्तसंस्था/ लंडन

जर्मनीचा माजी अव्वल पुरूष टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक स्थिती खुपच खालावली असल्याने कर्जदारांचे कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या टेनिस कारकीर्दीत मिळविलेल्या विविध चषकांचा लिलाव करण्याचे ठरविले होते. येथे सध्या सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे औचित्य साधून या चषकांचा लिलाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लिलावामध्ये सुमारे 680,000 पौंडस् (852,652 डॉलर्स) ची रक्कम गोळा झाली.

2017 साली 51 वर्षीय बेकरला ब्रिटीश न्यायालयाने कर्जदार म्हणून घोषित केले होते. येथील एका खासगी बँकर्सकडून त्याने मोठय़ा रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जाची फेड करण्यासाठी त्याने आपल्या टेनिस कारकीर्दीत मिळविलेल्या विविध 82 चषकांचा लिलाव करण्यात आला. 1989 साली अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया बेकरच्या या चषकाला सर्वाधिक म्हणजे 150, 250 पौंडसची बोली लावण्यात आली होती. बेकरने आपल्या टेनिस कारकीर्दीत सहा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्यामध्ये विम्बल्डन स्पर्धेतील तीन जेतेपदाचा समावेश आहे. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पकमध्ये त्याने दुहेरीत सुवर्णपदक मिळविले होते.