|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुक माझ्या संपर्कात

काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुक माझ्या संपर्कात 

सोलापूर / प्रतिनिधी

 काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेल्यांची संख्या मोठी असून भाजपात प्रवेश मिळावा यासाठी काहीजण माझ्या संपर्कात असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी दिली.

   आषाढी वारीनिमित्त आलेले विखे-पाटील यांनी शुक्रवारी दुपारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आघाडीच्या कारभाराला कंटाळूनच मी पक्ष सोडला. यापुढे आणखी लोकांनी पक्ष सोडला तर नवल वाटू नये अशी वेळ आता आली आहे. येणाऱया काळात कॉंगेस-राष्ट्रवादीतील दिग्गज म्हणून गणल्य़ा गेलेल्यांचा प्रवेश होणार आहे. याचा ताळमेळ कुठेतरी घालवा लागेल. युतीच्या नेत्यांनी अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली. तसेच अनेक महत्वाची अशी सकारात्मक कामे राज्यात सुरु आहेत.

दरम्यान, सकारात्मक भूमिका घेऊन राज्य सरकारने वेगवेगळ्या आघाडय़ांवर कामे करुन समाजमनात एक प्रकारचा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे कांग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेकजण भाजपात येण्यास इच्छुक आहेत. त्याचा फायदा नक्कीच राज्याला होईल. प्रत्येक पक्षाची भूमिका असते, ती लोकांपर्यंत मांडावी लागते. दरम्यान, युतीच्या संबंधात घेतला जाणारा निर्णय हा संबंधित नेत्यांनी घेण्याचा असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

Related posts: