|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विदय़ार्थ्यांच्या प्रवेशासाठी रोहितदादांनी घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट

विदय़ार्थ्यांच्या प्रवेशासाठी रोहितदादांनी घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट 

जादा तुकडय़ांना मंजुरी देण्याची शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

प्रतिनिधी/ तासगाव

तासगांव-कवठेमहांकाळ येथील शाळा-महाविदय़ालयातील विदय़ार्थ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन या विदय़ार्थ्यांच्या प्रवेश प्रश्नासाठी माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहितदादा आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.यावेळी जादा तुकडय़ांना मंजुरी देऊ अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यानी दिली.

     तासगांव-कवठेमहांकाळ येथील विविध शाळांचा दहावीचा व ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या निकालानंतर विदय़ार्थ्यांची अकरावी व कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी धावाधाव सुरू झाली आहे.यामध्ये अकरावी कॉमर्स व बी.कॉम भाग एक व इतर शाखेत प्रवेश घेणारे अनेक विदय़ार्थी आहेत.

     तासगांव-कवठेमहांकाळ येथील काही ज्युनिअर कॉलेज व महाविदय़ालयात या प्रवेशासाठी ठरावीक कोटा असल्याने व विदय़ार्थ्यांची संख्या अधिकची असल्याने अनेक विदय़ार्थी प्रवेशापासून वंचित राहताना दिसून येत आहेत.काही विदय़ार्थ्यांना इतरत्र धावाधाव करावी लागत आहे.आणि हे पालकांना आर्थिक दृष्टय़ा न परवडणारे आहे.

     हे डोळयासमोर ठेऊन तासगांव-कवठेमहांकाळ येथील विदय़ार्थी प्रवेशा पासून वंचित राहू नयेत म्हणून ज्युनिअर कॉलेज व महाविदय़ालयांना जादा तुकडय़ांना मंजुरी देऊन सर्व विदय़ार्थ्यांना प्रवेश दय़ावा  या मागणीसाठी रोहिदादा आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी मुंबई येथे मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन त्यांना दिले.

     यावेळी रोहितदादा पाटील यांनी मतदार संघातील विदय़ार्थ्यांची प्रवेश      प्रक्रियेबाबतची सदय़ परिस्थिती विषद करताना महाविदय़ालयातील सध्याची प्रवेश क्षमतेपेक्षा अधिकचे विदय़ार्थी आहेत,तर महाविदय़ालयांनी अधिकची विदय़ार्थी संख्या लक्षात घेऊन जादा तुकडय़ांना मंजुरी मिळावी असा प्रस्ताव विदय़ापिठाकडे पाठवला असून सुमारे 150ते 200 विदय़ार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न असून जादा तुकडय़ांना मंजुरी न मिळाल्यास या विदय़ार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते असे ही असे स्पष्ट केले.त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे निवेदनावर तातडीने स्वाक्षरी करून जादा तुकडय़ांना लवकरच मंजुरी देऊ अशी ग्वाही दिली.

      आजही आबांच्या आठवणीत..-शिक्षणमंत्री विनोद तावडे.

     तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील विदय़ार्थ्यांच्या प्रवेशा बाबत स्व.आर.आर.आबांचे चिरंजीव रोहितदादा पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात दुपारी दोन वाजता शिक्षणमंत्री यांची भेट घेतली.या प्रमुख प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आम्ही आबांच्याकडे विविध कामासाठी जात असे. आबांची कामाची पध्दत आम्ही आजही विसरलो असे स्पष्ट करून हे आबांची आठवण ऑफिस मधील आबांची खुर्चीच मी वापरत असून ऑफिस ही बदलले नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले.हे ऐकून रोहितदादा ही अवाप् झाले.तर आजही आबांच्या आठवणीत अनेकजण असल्याचे पाहवयास मिळत आहे.

Related posts: