|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पावसाळय़ातही 52 तलाव कोरडे ठणठणीत

पावसाळय़ातही 52 तलाव कोरडे ठणठणीत 

सुभाष वाघमोडे/ सांगली

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी जिल्हय़ात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने 84 लघु प्रकल्पांपैकी तब्बल 52 प्रकल्प कोरडे ठणठणीत पडले आहेत. याशिवाय जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील पाचही मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंबही नाही. या पावसाळय़ात पुरेसा पाऊस न पडल्यास पुढील उन्हाळय़ामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याबरोबर जिल्हय़ाला सलग तिसऱया वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

जिल्हय़ात जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून निम्मा पावसाळा संपत आला आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जिल्हय़ाच्या पावसाच्या सरासरीपेक्षा तब्बल 16 टक्के उणे पाऊस आहे. या कमी पडलेल्या पावसामुळे जिल्हय़ातील बहुतांशी तलाव कोरडे ठणठणीतच आहेत. जिल्हय़ात मध्यम 84 तर पाच मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी तब्बल 52 तलाव कोरडे आहेत. याशिवाय पाचही मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंबही नाही. लघु प्रकल्पामध्ये फक्त 10 टक्केच पाणीसाठा आहे. गत वर्षी 12 टक्के होता. यावर्षी तो दोन टक्केनी कमी आहे. या तलावात सध्या एक हजार 468 दलघफु इतका पाणीसाठा असून यातील काही तलवातील पाणी हे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजनेतून सोडलेले आहे.

 शिराळा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने या तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पात सात टक्के इतका पाणीसाठा आहे. तर जत तालुक्यातील दोड्डानाला, संख, कवठेमहांकाळमधील बसप्पावाडी, आणि मिरजेतील सिध्देवाडी या पाचही मध्यम प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत. आटपाडी तालुक्यात 13 लघु प्रकल्प आहेत. पैकी तीन तलावात पाण्याचा थेंबही नाही. निंबवडे तलवात सहा, बनपुरीमध्ये 12, दिघंचीमध्ये 11, शेटफळेमध्ये 25 टक्के पाणीसाठा आहे मात्र हे पाणी पावसाचे नसून ते टेंभू योजनेचे आहे. जत तालुक्यात 26 लघु प्रकल्प आहेत. पैकी निम्म्यावर म्हणजे 18 तलावं कोरडी आहेत. खोजनवाडी तलावात तीन कोसारी 17, प्रतापूर 7, तिपेहळ्ळी तीन टक्के इतके पाणी आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात 10 तलाव असून यातील तब्बल आठ तलाव कोरडे आहेत. तर म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने नागोंळेत 46 तर लांडगेवाडी तलावात दोन टक्के पाणीसाठा आहे. कडेगाव तालुक्यात नऊ तलावापैकी दोन तलाव कोरडी आहेत. तर ताकारी योजनेमुळे हिंगणगाव 51, शिवाजीनगर 89, शाळगाव  9 आणि करांडेवस्ती 19 टक्के पाणीसाठा आहे.

 तासगाव तालुक्यात सहा तलाव असून यातील पाच तलाव कोरडे आहेत. तर पुणदी तलावात 12 टक्के इतका पाणीसाठा आहे. वाळवा तालुक्यात दोन पैकी दोन्ही तलाव कोरडी आहेत. खानापूरमध्ये आठ तलाव असून सहा तलाव कोरडे आहेत तर ढवळेश्वर तीन, वेजेगाव 24 टक्के इतका पाणीसाठा आहे. मिरज तालुक्यात तीन पैकी भोसे येथील तलावात पाणी नाही. खंडेराजुरी 18, लिंगनूर 14 टक्के इतका पाणीसाठा आहे.

कोरडय़ा तलावांची नावे

आटपाडीतील गोरडवाडी, महाडिकवाडी, शेटफळे, जतमधील अंकलगी, बेळुंखी, भिवर्गी, बिळूर, बिरनाळ, दरिबडची, गुगवाड, जालीहाळ, मिरवाड, पांडोझरी, शेगाव क्र 1 आणि 2, सिध्दनाथ, सोरडी, तिकोंडी क्र 1 आणि दोन, उमराणी, वाळेखिंडी, येळवी, कडेगावमधील अळसंद, कडेगाव, कवठेमहांकाळमधील बोरगाव, दुधेभावी, घोरपडी, हरोली, कुची, लंगरपेठ, आणि रायवाडी, खानापूरमधील लेंगरे, पारे, सुलतानगादे, भिरजेतील भोसे, तासगावमधील अंजनी, बलगवडे, लोढे, मोराळे, पेड या तलावांचा समावेश आहे.

तलावातील पाणीसाठय़ाची टक्केवारी

तालुका     टक्केवारी

Related posts: