|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » फोर्ब्सच्या यादीत अक्षय कुमार 33 व्या स्थानावर

फोर्ब्सच्या यादीत अक्षय कुमार 33 व्या स्थानावर 

 

ऑनलाईन टीम /मुंबई : 

अक्षय कुमारला फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱया कलाकारांच्या लिस्टमध्ये 33 वे स्थान दिले आहे. तो या लिस्टमध्ये जागा मिळवणारा एकमेव भारतीय आहे. त्याची कमाई 6.5 कोटी डॉलर (444 कोटी रुपये) आहे. मागच्या एका वर्षांमध्ये त्याने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपयांपासून 68 कोटी रुपये घेतले. 2018 च्या लिस्टमध्ये अक्षय 270 कोटी रुपयांच्या कमाईसोबत 76 व्या क्रमांकावर आला आहे.

फोर्ब्सच्या या यादीत गायिका टेलर शिफ्ट अव्वल स्थानी आहे. 2016 मध्येही टेलर या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. दुस-या क्रमांवर काइली जेनर आणि तिस-या क्रमांकावर केनी वेस्टने बाजी मारली आहे.

 

Related posts: